08048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
wwwautadehospitals .in अस्थिबंधाना इजा बऱ्याच वेळेस एक्स-रे मध्ये फ्रँक्चर नाही, हे कळाल्यावर मन सुखावत.पण कधीकधी ते सुख क्षणभंगुर ठरत.वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार एकस-रे म्हणजे सावली.फक्त सावली पाहून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते.तसेच नुसते एकस-रे काढून निर्णय घेणेही चुकीचे असते.म्हणून डॉक्टर म्हणतात, प्रथम रुग्ण तपासतो, मग एकस –रे किंवा त्याचा रिपोर्ट दाखविण्याची घाई असते. रुग्णाची विचारपूस केल्यावर ज्याला आपण केस-हिस्ट्री म्हणतो.त्यात त्याला कुठे व कसल्या प्रकारचा मार लागला असेल, याचा अंदाज येतो, तसेच तपासल्यावर नेमका कोणत्या ठिकाणी मार लागला आहे, हे कळते.त्यानंतर एकस –रे चा बोध होतो. तो निश्चितच अधिक चांगला होतो.बारीक फ्रँक्चर असले तरी ते मग दिसून येते.तोच एकस –रे रुग्ण तपासण्याआधी पाहिला , तर अगदी बारीक क्रँक- फ्रँक्चर नेमक्या ठिकाणी लक्ष केंद्रित न केल्यामुळे नजरेतून सुटते.तसेच काही अशा प्रकारचे मार असतात, कि ज्यामुळे फ्रँक्चरइतकेच अपंगत्व येते. हाडांच्या भोवती स्नायू , शिरा असतात.त्या माराचा एकस-रे काढल्यास ‘नो- बोन एन्जुरी’ असा रिपोर्ट क्ष-किरणतज्ञ देतात.पण तसेच ते म्हणतात kindly correlate clinically म्हणजे तपासणी करूनच निश्चित काय ते कळू शकेल. अस्थिबंधाचे मार सांध्याच्या हालचाली विशीष्ट मर्यादीत कक्षांमध्ये होत असतात.गुडघ्याची हालचाल एका दिशेत होते.(युनी-अँक्शीयल) तर खांद्याची हालचाल वेगवेगळ्या दिशेत होते (मल्टी - अँक्शीयल), सांध्याच्या मुलभूत रचनेमुळे आणि अस्थिबंधामुळे प्रमाणापेक्षा जास्त हालचाल होत नाही. जर प्रमाणापेक्षा जास्त हालचाल झाली , जर प्रमाणापेक्षा जास्त हालचालझाली.तर सांध्याचे आवरण फाटते व सांध्यांत रक्तस्त्राव होतो. त्याला Haemarthosis म्हणतात.तसेच सांध्याचे स्थिरता देणारे अस्थिबंध फाटू शकतात.असे जरझाले, तर सांधा अस्थिर होतो.गुडघ्याचे अस्थिबंध फाटले, तरचालताना पाय लपकतो तसेच घोट्याच्या अस्थिबंधला मार असेल तर तो वारंवार मुरगाळतो.हलका मार असेल म्हणजे अस्थिबंध नुसते ताणले गेले असतील, तर औषधाने सूज कमी होते व तो बरादेखील होतो.पण मार जास्त प्रमाणात असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असते.मर्यादेपेक्षा जास्त ताणले गेले, तर अस्थिबंध फाटतात.फाटण्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अर्धवट किंवा अपूर्ण व पूर्ण. ज्याप्रमाणात अस्थिबंध फाटतो, त्याप्रमाणात त्यापासून समस्या निर्माण होतात.सांधा अस्थिर होतो.त्यामुळे परत पडून अजून मार लागू शकतो किंवा खूप दिवस सारखे सारखे लपकल्यामुळे सांध्याची लवकर झीज होते व तो सांधा खराब होतो. म्हणून अशी जर अस्थीबंधाची इजा-मार असेल, तर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. अपूर्ण अस्थिबंध फाटण्याचे प्रमाण जास्त रुग्णांमध्ये आढळतो. त्याचा उपचार सोपा असतो.कधी फक्त चिकटपट्टीने बांधले म्हणजे स्टॅपिंग केले, तरी बरा होतो किंवा कधी प्लास्टर करावे लागते.अशा प्रकारे काही आठवडे सांध्याला स्थिर ठेवण्यात येते.असे केले असता मार बसलेल्या सांध्यावर पुन्हा ताण पडत नाही व त्याला चागला आराम मिळतो.हालचाल न झाल्यामुळे त्याचे हिलिंग चांगले होते. हाताच्या सांध्यासाठी तीन आठवडे , तर पायाच्या सांध्यासाठी चार – सहा आठवडे हालचाल बंद ठेवण्यासाठी बांधून ठेवावे लागतात.नुसता लेप लावून किंवा साधारण बांधून पुन्हा ताण पडतोच.त्यामुळे आत बऱ्या होणाऱ्या इजेतल्या पेशींवर इतर घटकांचा गुंता जास्त प्रमाणात वाढतो.याला फायबोसीस म्हणतात.असे झाल्यामुळे इजा बरी होण्यास जास्त दिवस वेळ लागतो व होणारे दुखणेही जास्त दिवस वेळ लागतो व होणारे दुखणेही जास्त कालावधीसाठी रेंगाळते.काही पूर्ण फाटलेल्या अस्थिबंधासाठी शस्त्रक्रिया पण कराव्या लागतात.कधी कधी मार लागल्यामुळे सांधे निखळतात.