08048040021
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
तुमच्याही सांध्यांची झीज होतेय का? ही लक्षणे आरोग्यासाठी आहेत हानिकारक बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. धावपळ, ताणतणावामुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. शरीराची हालचाल कमी होत असल्यानं हाडांवरही वाईट परिणाम होतो. शरीरातील विविध अवयवातील पेशींचे गुणधर्म वेगवेगळे असतात. जसे हाड मोडले तर ते पुन्हा जुळू शकते. कारण त्याची पुनर्निर्मिती क्षमता (रिजनरेशन कपॅसिटी - Regeneration capacity ) आहे. मात्र, काही अवयवांच्या पेशी या विशेष पेशी अथवा उती असतात. त्यामुळे त्यांच्यात पुनर्निमिती क्षमता नसते. अशा अवयवांची हानी झाली की, मग ते नेहमीसाठी कमकुवत होतात. 1) आनुवंशिकता: 2) स्थूलपणा : 3.सांध्याच्या रचनेत दोष निर्माण झाल्यामुळे (अ) पायातील वाकांमुळे, बालपणात ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेने पायात वाक येतो.या वाकामुळे सांध्यांवर समप्रमाणात भार पडत नाही.गुडघ्यात वाक आतील बाजूस असेल तर जेनु वारम म्हणतात. आ) अव्हस्क्युलर नेक्रोसीस : खुब्यातील संध्याच्या मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकाला ‘फिमोरल हेड’ असे म्हणतात.त्याचा आकार गोलाकार असतो. काही कारणमुळे रक्त पुरवठा कमी पडल्यानंतर त्या आकारात बदल झाला तर समप्रमाणात भार न राहिल्यामुळे त्याची झीज होते. ‘अव्हस्क्युलर नेक्रोसीस’ या आजारातही असेच होते. हा आजार अतीमहासेवन किंवा स्टेरॉइड्ची औषधे यामुळे होतो. (इ) सांध्यामध्ये समप्रमाणात भार न पडण्याचे कारण सांध्याची बदललेली रचना. ती फ्रँक्चरमुळेसुद्धा बदलू शकते.सांध्यात फ्रँक्चर असल्यास जास्त प्रमाणात झीज होण्याची संभावना असते. (ई) सांध्याच्या अस्थिबंधामुळे सांध्याच्या हालचालींवर नियंत्रण असते.सांधे निखळण्यापासून रोखण्याचे काम हे अस्थिबंधच करत असतात.त्यांना मार लागतो तेव्हा ते ताणले जाऊन सैल होतात.त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त हालचाल होते व झीजही जास्त होते.खेळाडूंमध्ये बऱ्याच वेळा पाय मुरगळने, सांध्यांना सूज येणे हेप्रकार घडत असतात पण त्यापुढे होणाऱ्या आजारांची कल्पना नसल्यामुळे बरेच जण दुर्लक्ष करतात व कायमस्वरूपीचे नुकसान ओढवून घेतात. १. इतर आजारामुळे झालेली झीज: पूर्वी ज्या सांध्यामध्ये काही आजार झाला असेल तर अशा सांध्यामध्ये झीज लवकर होते जसे- १.संधिवात २) गाऊट ३) सांध्याचा क्षयरोग ४) हिमोफिलिया इत्यादी. सुरुवातीला कार्टिलेजमध्ये भेगाची खोली जास्त नसते.नंतर मात्र आवरणात खोलवर जाऊन हाडापर्यंत जाते व खालच्या हाडावर भार येण्यास प्रांरभ होतो व त्या भागाची झीज झपाट्याने होते.झीज होताना सुरुवातीला काही पोकळी निर्माण होते. त्यास सबकाँडल सिस्ट म्हणतात. त्यामुळे हाडे दाबली जातात व हाडांतील घनता वाढते.त्यास बोनी स्क्लेरोसिस म्हणतात.या स्क्लेरोटीक बोनमध्ये रक्तप्रवाह मोकळा नसतो.त्यामुळे हाडांच्या आतले प्रेशर वाढते (रेजड इंट्राआँशियस प्रेशर ) त्यामुळे हाडे दुखायला लागतात. सांध्याजवळील हाडांच्या भागात हाडांचे काही बारीक ठोके तयार होतात.याला ऑस्टीओफाइट्स म्हणतात. ऑस्टीओआरथायटीसची लक्षणे : सांधेदुखी : : ही सहसा गुडघ्याच्या सांध्यात होते.याची सुरुवात सांध्यात हलक्या स्वरुपाच्या दुखण्याने होते.दुखण्याची काळ प्रमाण हे हळूहळू वाढत जाते. झीज होणाऱ्या सांध्यामध्ये प्रामुख्याने गुडघ्याच्या सांध्यामध्ये आढळते.त्यामुळे जिने चढताना किंवा उतरतांना त्रास होतो. खाली बसल्यानंतर उठताना त्रास होतो सांध्यातील ताठरपणा : प्रामुख्याने उठताना हा ताठरपणा जाणवतो.तो साधारणताः १५ ते ३० मिनिटे असतो.दिवसाही बऱ्याच वेळा बसुन किंवा झोपून राहिल्यामुळे ताठरपणा जाणवतो . सांध्यात सूज येणे : या आजारात सांधे सुजून येतात. तपासणीच्या वेळेस सांध्यात वाक आलेला. आढळून येतो तसेच सांध्याची सूजही लक्षात येते.कधी गुडघ्यांच्या मागच्या बाजूला सूज आल्यामुळे छोटीसी गाठ तयार होते त्यास बेकरस सिस्ट असे म्हणतात.जर ही गाठ फुटली तर खूप त्रास होऊ शकतो व तीव्र वेदना होऊन तेथील नसांवर किंवा रक्तवाहिन्यांवर दाब पडून इतर समस्या उदभवू शकतात.तपासणीच्या वेळेस मधल्या हाडांवर दाबल्यानंतर सांध्याच्या हाडावर मधल्या बाजूस वाटीच्या हाडांवर वेदना जाणवतात तसेच संध्याच्या आत येणारा आवाज (क्रेपिटस) येतो किंवा जाणवतो.तसेच सांध्यात आलेली सुजपण जाणवू शकते.